.....गावाच्या पूर्वेला घनगर्द गगनचुंबी वृक्षांच्या आडोशाला काहीसा लाजरा बुजरा तिचा रंगमहाल, सूर्य मावळतीला आला की तिच्या रंगमहालतील दिवे रंगमहालचा एकेक कोपरा उजळून काढण्यासाठी जणू आपापसात पैज लावतात. दिव्यांच्या त्या लखलखत्या प्रकाशात तिचा चेहरा पहिला की, दिव्यांचा प्रकाश तिच्या चेहर्यावर आहे की, तिच्या चेहर्याचा प्रकाश दिव्यांनी स्वीकारला काहीच काळेनास होतं.
रात्र चढायला लागली की, पश्चिमेकडे विसवलेलं गाव , अंधाराची चादर अंगावर पांघरुन निद्रेच्या आडोलशाला जातं, तेव्हाच तिच्या रंगमहालातल्या वाद्यांवर ताल सुर पकडण्यासाठी पैज लागलेली असते. तिच्या पायातील नुपुरांचा कर्णमधूर आवाज दाहिदिशेला घुमताना वातावरणात जणू मदिरेची धुंदी पसरवीत जातो. तबल्यावर खान साहेबांचा हात क्षणातच ढगांचा गडगडाट तर क्षणातच चांदण्यांची बरसात करून जातो. सातरीच्या मधुरमय नादात रंगमहालात हजर असलेल्या तरुण काळजांवर केव्हा गारुड झालं कुणाच्याही लक्षात येत नाही. सगळे कसे भारावलेले मदिरेचा थेंबही न चाखता धुंधीच्या अधीन झालेले तिच्या नितळ गळ्यातून निघलेली एखादी तान आणि रंगमहालात चालताना तिच्या पदन्यासाची जादू हळूहळू वातावरणात भरत जाते.
पेटत्या दिव्यांचा वाती आता तारुण्यात आलेल्या..........
क्रमशः

No comments:
Post a Comment